Viral video: लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आई-वडिलांची सेवा करताना दिसतात. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होतं, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. मात्र, ज्या मुली आई-वडिलांचा विचार न करता, घरातून निघून जातात, त्यांनी मागे आई-वडिलांचे काय हाल होत असतील याचा कधी विचार केलाय का? सोशल मीडियावर कीर्तनकार महाराजांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून, हा व्हिडीओ वयात येणाऱ्या मुलीला प्रत्येक बापानं दाखविला पाहिजे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.
View this post on Instagram
कीर्तनकार बाळासाहेब शिंदे महाराज सांगतात, “मुलींनो, तुमचा बाप एवढा प्रेम करतो ना तुमच्यावर. २२ वर्षांपर्यंत बापानं सांभाळलं आणि २२ दिवस एखाद्या मुलावर प्रेम करून तुम्ही ज्या वेळेस निघून जाता ना, त्यावेळी त्या बापाच्या काळजावर घाव होतो.” पुढे ते सांगतात, “माझ्या ताईंनो, एवढं वाक्य घरी घेऊन जा, तुम्हाला शाळेमध्ये जाता आलं तर जा किंवा नका जाऊ, तुम्हाला कॉलेजमध्ये जाता आलं तर जा किंवा नका जाऊ, जॉब करता आला तर करा किंवा करू नका; पण आपल्या ईश्वरासमान बापाची मान गावात खाली होईल, असं पाऊल कधी टाकू नका.” या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समोर बसलेल्या मुली आणि त्यांचे वडील रडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
View this post on Instagram
कोणताच मुलगा किंवा मुलगी कोणत्याही जन्मी आई-वडिलांच्या घामाच्या एका थेंबाचीसुद्धा परतफेड करू शकत नाही. आई-वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात, प्रसंगी स्वत: उपाशी राहतात; मात्र मुलांना काही कमी पडू देत नाहीत. मुलांना चांगलं शिक्षण देऊन, तो ‘मोठा’ होण्याची स्वप्नं पाहतात. लेक ही वडिलांच्या काळजाचा तुकडा असते. लहानपणापासून वडील लेकीला अगदी फुलाप्रमाणे जपतात; मात्र हीच मुलगी जर मोठी झाल्यावर वडिलांच्या विरोधात जात असेल, तर कोणत्याही वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ balasaheb_maharaj_shinde नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत वडिलांवरचं प्रेम व्यक्त करीत आहेत. एकानं म्हटलंय, “अगदी बरोबर.” आणखी एकानं, “बापाचं प्रेम कुणालाच कळतं नसतं,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.