शाळेत उशिरा आल्यावरून शिक्षिका आणि मुख्यध्यापकांमध्ये बेदम मारहाण, व्हिडिओ पहा Teachers viral videos

Teachers viral videos : बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींनी धू धू धुतलं आहे. वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

अधिक माहितीनुसार, ही घटना पटना येथील बिहटा प्रखंड येथील एका विद्यालयातील असून तेथील मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये वाद होता. त्यांच्यामध्ये एका गोष्टीवरून क्लासरूममध्ये वाद पेटला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. यामध्ये एका शिक्षिकेची आईसुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे.

 

दरम्यान, शाळेतील वर्गात सुरू झालेली ही लढाई शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेतापर्यंत जाऊन पोहोचली. दोघीही एकमेकांचे केस ओढून चप्पलेने, लाथेने, चापटेने मारताना करताना दिसत आहेत. तर काही महिला त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत. यादरम्यान गावातील काही तरूणांनी या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

 

या घटनेबद्दल बोलताना शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा शाळेतील त्यांच्यामध्ये असलेला वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांच्याकडे या मारहाणीबद्दल स्पष्टीकरण मागितले असून उच्च अधिकाऱ्यांनाही या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. अशा घटनांमुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे शाळेतील शिक्षकांमधले वाद थांबायला हवेत अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत Teachers viral videos.

Leave a Comment