shocking video of train सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्यासाठी लोक इतक्या धोकादायक गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. याचा विचार करायला लावणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. अशा घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत, जिथे सेल्फी काढताना लोकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
While Making Tiktok Videos A Train Hits the guy in Bangladesh
https://t.co/06kZEovLGn— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 27, 2024
काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. त्यामध्ये ट्रेनसोबत सेल्फी घेताना एक मुलगा गंभीर जखमी झालाय, याचा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
While Making Tiktok Videos A Train Hits the guy in Bangladesh
https://t.co/06kZEovLGn— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 27, 2024
धोकादायक सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात कित्येक जणांचे जीव गेल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. तरीही अनेकांच्या डोक्यातलं हे सेल्फीचं खूळ कमी झालेलं नाही. या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता की, काही तरुण रेल्वे ट्रॅकवर उभे राहून सेल्फी घेण्यासाठी थांबले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी ट्रेन येताच सगळे रुळांवरून बाजूला होतात आणि मोबाईल फोन काढत सेल्फी काढण्याच्या तयारीत असतात. पण याच दरम्यान एका मुलासोबत असा अपघात झाला; ज्याने सगळेच हैराण झाले आहेत.