लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार? October 21, 2024 by Atul Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : खरं तर राज्यात विधानसभा निवडणूक लागू झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे. आणि योजनेच अर्ज नोंदणी देखील बंद करण्यात आल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले होते. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर लाडकी बहीण योजना ही सूरूच राहणार असल्याची माहिती दिली होती. लाडकी बहिणीची गावानुसार लाभार्थी यादी नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे म्हणजेच नोव्हेंबरपर्यंतचे 7500 जमा झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूका लागणार असल्यानेच सरकारने नोव्हेंबरचा निधी महिलांच्या खात्यात ऑक्टोंबरमध्ये जमा केला होता. त्यामुळे महिला आता डिसेंबरच्या निधीच्या वाट पाहतायत. अशात आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागू झाली आहे. त्यामुळे ही लाडकी बहीण योजना बंद होईल? अशी चर्चा सूरू झाली आहे. त्यामुळे या चर्चेत किती तथ्य आहे? आणि महिला व बालविकास विभाग यावर नेमकं काय म्हणाले आहे? हे जाणून घ्या. लाडकी बहिणीची गावानुसार लाभार्थी यादी नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा खरं तर राज्यात विधानसभा निवडणूक लागू झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे. आणि योजनेच अर्ज नोंदणी देखील बंद करण्यात आल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले होते. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर लाडकी बहीण योजना ही सूरूच राहणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळले होते. लाडकी बहिणीची गावानुसार लाभार्थी यादी नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे, अशी माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिली होती.