Maharashtra Assembly Election 2024: महायुतीच्या 288 उमेदवारांची संपूर्ण यादी

Maharashtra Assembly Election 2024: मुंबई: महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती युती ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महायुतीच्या 288 जागांची यादी जाहीर यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप 148 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 85 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस 51 जागा लढवत आहे. उर्वरित 4 जागा महायुतीच्या इतर मित्रपक्षांना देण्यात आल्याचे वृत्त आहे.

महाविकास आघाडी (MVA)ही सध्या विरोधी पक्षात आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT), काँग्रेस आणि शरद पवार यांच्या NCP (SP) यांचा समावेश आहे.

महायुतीच्या 288 जागांची यादी जाहीर यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागा मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता आला. त्यापाठोपाठ त्यांचा तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला 56 जागा मिळालेल्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे 44 आणि 54 जागा मिळाल्या होत्या.

मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटली होती. पण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची स्थापन करत आपलं सरकार राज्यात आणलं.

महायुतीच्या 288 जागांची यादी जाहीर यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तथापि, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जून 2022 मध्ये शिवसेनेत फार मोठं बंड झालं. ज्यामुळे शिवसेनेत फूट पडली. तसंच ठाकरेंचं सरकारही कोसळलं. त्यानंतर वर्षभरानंतर, म्हणजे जुलै 2023 साली अजित पवार यांच्यासह अनेक आमदार सत्ताधारी महायुतीत सामील झाले.

मतदानाची तारीख
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

एकूण जागा
महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 29 अनुसूचित जातींसाठी आणि 25 अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. यावेळी राज्यात 9.64 कोटीहून अधिक लोक मतदानासाठी पात्र आहेत.

 

Leave a Comment