या शेतकऱ्यांचे होणार सरसकट कर्जमाफी एकनाथ शिंदे यांची मोठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, रोजगार निर्मिती आणि वृद्धांना पेन्शन वाढ यासारख्या प्रमुख घोषणा करण्यात आल्या.

या शेतकऱ्यांची होणार सरसकट कर्जमाफी

इथे क्लिक करून पहा

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या दोन आठवड्यांनी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारतोफांचा झंझावात सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आता नुकतंच महायुतीची एक प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजनेसह रोजगाराबद्दलही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

या शेतकऱ्यांची वीज बिल माफ

इथे क्लिक करून पहा

महायुतीच्या प्रचाराची पहिली प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यापूर्वी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांसह महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 कलमी कार्यक्रम सादर करत प्रचाराचे रणशिंग फुंकले.

पंचगंगेच्या महापुरावर तोडगा काढण्यासाठी योजना
या १० कलमी कार्यक्रमासह एकनाथ शिंदेंनी पंचगंगेच्या महापुरावर तोडगा काढण्यासाठीची नवीन योजनाही जाहीर केली.
“कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार येणाऱ्या पंचगंगेच्या महापूरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ३२०० कोटींची योजना सरकारने आणली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या २३ तारखेला छोट्या मोठ्या लवंग्यांऐवजी अँटम बॉम्ब फोडायचा आहे”, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.

यावेळी एकनाथ शिंदेंनी आमचे सरकार विकास करणारे सरकार आहे, असेही सांगितले. “डबल इंजिनचे सरकार हे विकास करणारे सरकार असून राज्याचा विकास करायचा असेल तर राज्यात समविचारी सरकार असायला हवे”, असे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले. “आमच्यावर दिल्लीत जातो म्हणून टीका होते, मात्र राज्यातील अनेक योजनांसाठी निधी आणण्यासाठी आम्ही दिल्लीला जातो”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 

Leave a Comment