“शाळेत जात नाही, म्हशी राखते” चिमुकलीने स्पष्टच सांगितले, VIDEO पाहून पोट धरून हसाल

Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी हे लहान मुले डान्स करताना दिसतात तर कधी गाणी म्हणताना दिसतात. कधी हे लहान मुले मजा मस्ती करताना दिसतात कर कधी ढसा ढसा रडताना दिसतात. अनेकदा आईवडील आवडीने त्यांच्या मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या चिमुकल्या मुलीबरोबर मजेशीर संवाद साधताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
आई : शाळेला जातेय की काय करतेय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by hasa.potbharun (@hasa.potbharun)

चिमुकली : म्हशी राखते
आई : आणि शाळा..
चिमुकली : नाही
आई : शाळेला नाही जायचं? मग काय करते तू?
चिमुकली : म्हशी राखते
आई : किती म्हशी राखते?
चिमुकली : दोन
आई : काय करते म्हशी राखून? तु डॉक्टर होणार आहे ना?
चिमुकली : नाही
आई : तु म्हणालीस की मला डॉक्टर होणार आहे म्हणून..
चिमुकली : नाही
आई : मग काय करते तू
चिमुकली : म्हशी राखते

हेही वाचा :‘बापरे! तिने नवऱ्याच्या मानेवर पाय ठेवून…’ करवा चौथ स्पेशल रील बनवण्यासाठी महिलेचा स्टंट, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

मायलेकीचा हा संवाद ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या घरातील चिमुकल्यांची आठवण येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “शाळेला जाणार नाही पण म्हशी राखते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by hasa.potbharun (@hasa.potbharun)

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIRAL VIDEO : आतापर्यंतचा सर्वात भारी व्हिडीओ! डान्स करताना स्पीकर बंद पडला अन्… असा पूर्ण झाला तिचा पर्फोमन्स

hasa.potbharun या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “म्हशीचं लय अवघड आहे पिल्लू” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वीही लहान मुलांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात, हे त्या चिमुकलीने एका सार्वजानिक कार्यक्रमात सांगितले होते.

Leave a Comment