शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा ! 25 हजार ते 5 लाख खात्यावर जमा यादीत नाव तपासा October 21, 2024 by Atul येवला : जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच पिकाच्या नुकसानीला संरक्षणासाठी विम्यातून खात्यावर सुमारे ८३० कोटी रुपये वितरित झाले आहेत. पीकविमा काढलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी २५ हजार ते जास्तीत जास्त पाच लाखांहून अधिक रक्कम एकत्रित कुटुंब आणि वेगवेगळे खाते असलेल्यांना मिळाली आहे. गेल्या वर्षी दुष्काळ, अल्प पावसामुळे खरिपाच्या पिकांची पूर्णतः वाट लागली. (crop insurance for farmers 25 thousand to 5 lakh account deposit) लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र शेतातच पिकांचा पालापाचोळा झाल्याने बियाण्यांचा खर्चही निघाला नव्हता. केंद्रीय पथकाने जिल्ह्यात पाहणी करून दुष्काळही जाहीर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, दुष्काळ जाहीर झाला; पण मदत कधी, याचे उत्तर मिळत नव्हते. किंबहुना, मोजक्या शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिल्यावर कंपन्यांनी हात वर केले होते. लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा यंदा पाच-पन्नास नव्हे, तर शंभर वर्षाच्या इतिहासातही विम्याची एवढी मदत मिळाली नसल्याचे शेतकरी सांगतात. आपत्तीत विमा कंपन्यांच्या मनमानीमुळे वर्षानुवर्षे शेतकरी या लाभापासून वंचितच राहतात. या वेळी मात्र कसर भरून निघाली, विमा योजनेतील पाच लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपयांची विमा रक्कम खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत ८३० कोटी रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मिळाले. “जिल्ह्यात आणि तालुक्यात यापूर्वी कधीही एवढा पीकविमा मिळालेला नाही. यापूर्वी सर्वाधिक १४ कोटी रुपये मदत मिळाल्याचे आठवते. यामुळे गेल्या वर्षी शेतीचे पूर्णपणे झालेले नुकसान काही अंशी भरून निघाले आहे.” अशोक कुळधर, शेतीतज्ज्ञ, येवला लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा