‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली जान्हवी किल्लेकर सध्या नेहमी चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वी तिने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची त्याच्या गावी जाऊन भेट घेतली होती. या खास भेटीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
या फोटोंमध्ये निळ्या रंगाच्या डिझाइनर साडीत जान्हवीचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे.
जान्हवीचे निळ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.