Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. परंतु, या योजनेबाबत विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर आरोपांची राळ उडवली आहे.
लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव
पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. परंतु, या योजनेबाबत विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर आरोपांची राळ उडवली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा सूर विरोधकांनी आवळला आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षांना पुन्हा एकदा धारेवर धरलं आणि या योजनेबाबत मोठी घोषणा केली. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या खर्चाबाबत पुढील पाच वर्षांची तरतूद केली आहे. ही योजना पुढे सुरु राहील, असं मोंठ विधान अजित पवार यांनी केलं. ते पुण्याच्या सांगवी येथील कार्यक्रमात बोलत होते.
लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव
पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अजित पवार म्हणाले, विरोधी पक्ष महिलांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2 कोटी 3 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. पैसा थेट महिलांच्या खात्यात जमा केला आहे. जेव्हा एखाद्याच्या घरी मनी ऑर्डर येतं, तेव्हा त्या व्यक्तीलाही असं वाटतं की, मलाही काहीतरी बक्षिस मिळालं पाहिजे. त्यामुळे मनी ऑर्डर आणणाऱ्या व्यक्तीला काहीतरी बक्षिस द्यावं लागत होतं. परंतु, आम्ही लाडकी बहीण योजनेत कोणताही अडथळा ठेवला नाहीय. आम्ही महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करत आहोत. या योजनेसाठी पुढील पाच वर्ष पैशांची तरतूद केली आहे.
लाडकी बहिणी बहिणीची नवीन लाभार्थी यादीत नाव
पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाडकी बहीण योजना सुरू राहण्यासाठी महायुतीला मतदान करा. विधानसभा निवडणुकीनंतर अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली, तर राज्याचा पुढील अर्थसंकल्प हा सात लाख कोटींचा असेल. ज्यामध्ये 45,000 कोटी लाडक्या बहिणींसाठी असतील आणि राज्यातील शेतकऱ्यांचं वीजबील माफ करण्यासाठी 15000 कोटींची तरतूद केली जाईल. राज्याचा मागील अर्थसंकल्प साडेसहा कोटींचा होता.
“लाडकी बहीण योजना इतक्या मोठ्या प्रमाणात चालवली जाऊ शकते, असं विरोधकांना वाटलं नव्हतं. त्यामुळे विरोधकांसाठी ते अनपेक्षित होतं. “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नये यासाठी महिलांना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. 20 नोव्हेंबरला निवडणुकीचं मतदान आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहेत”,असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एनएनआयला दिलेल्या मुलाखतीत नुकतच केलं.