लाडकी बहीण बहिणीचा पुढचा हप्ता या तारीख वेळ जाहीर डायरेक्ट खात्यात होणार जमा

Ladki Bahin Yojana Update: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा निधी थांबविला गेला. यामुळे या योजनेला स्थगिती मिळाल्याची चर्चा सुरू होती. यावर आता सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Ladki Bahin Yojana Update: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर सरकारी कामांवर अंकुश लागतो. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बाल विकास विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र दिले होते. आता ही योजना बंद होण्याची चर्चा सुरू झाली असताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी थेट डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा केली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबविण्याचे निर्देश दिल्यानंतर काल (दि. १९ ऑक्टोबर) ही योजना बंद होणार असल्याची अफवा उठली होती. त्यानंतर सरकारकडून लागलीच त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले.

अदिती तटकरे यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री एक्सवर पोस्ट करून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार” असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.”

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळणार
“सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, ही नम्र विनंती”, असेही अदिती तटकरे पुढे म्हणाल्या.

दरम्यान राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अदिती तटकरेंची पोस्ट शेअर करत या योजनेबद्दल मोठे विधान केले. राज्यातील महिलांनी भूलथापांना बळी पडू नये, असे ते म्हणाले. “या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्यानं अतिशय जबाबदारीनं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींना, मायमाऊलींना विनंती आहे की, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये”, अशी पोस्ट अजित पवार यांनी एक्सवर केली आहे.

२ कोटींहून अधिक महिला पात्र
महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली आहे. आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले.

 

Leave a Comment