“मरता मरता वाचला भाऊ”, चालत्या ट्रेनमधून उलट्या दिशेने उतरला अन्…, VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका October 29, 2024 by Atul Train viral video मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’, असं म्हणत मुंबई लोकलमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या असंख्य माणसांची दर दिवशी गर्दी पाहायला मिळते. 👇👇👇👇 व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा View this post on Instagram A post shared by Patel Suraj (@suraj_patel_jj) यात अनेक जण मुंबईत पहिल्यांदाच आलेले असतात आणि त्यांना ट्रेनमधून नेमकं कसं उतरायचं तेच कळत नाही. अशात ज्यांना चालत्या ट्रेनमधून कसं उतरायचं हेच माहीत नसतं आणि दुसऱ्यांना बघून स्वत:पण असलं काहीतरी करायला जातात आणि स्वत:वर संकट ओढवून घेतात. सध्या अशाच माणसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण चालत्या ट्रेनमधून उतरताना दिसतोय. पण, या नादात त्याचा तोल जातो आणि तो खालीच पडतो. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा View this post on Instagram A post shared by Patel Suraj (@suraj_patel_jj) व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ट्रेन आपल्या वेगाने धावताना दिसतेय. अशातच स्टेशन जवळ येताच चालत्या ट्रेनमधून एक माणूस घाईघाईत उलट्या दिशेने उतरताना दिसतोय. पण, या नादात तो मोठं संकट ओढवून घेतो. ट्रेनमधून उतरताना या माणसाने आधी चप्पल खाली फेकतो. मग उतरता त्याचा तोल जातो आणि ट्रेन आणि फलाटामधील जागेत तो अडकून राहतो. या परिस्थितीत आजूबाजूची माणसं त्याची मदत करण्यासाठी लगेच धाव घेतात आणि त्याला तिथून बाहेर काढतात. फलाटावर सुखरूप आल्यानंतर अनेक जण त्याला समजावत असतात.